सकल मराठा समाज – बोईसर एका एक दिवासाचे लाक्षणिक उपोषण!
प्रमोद तिवारी
बोईसर : जालना येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आदोलनाच्या समर्थनार्थ व संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण व आंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे मराठा समाजाच्या आदोलाकांवर पोलीसांकडून करण्यात आलेल्या अमानुष लाठीमारातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मच्यारी यांना कायम स्वरूपी निलंबित करण्यात यावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाज बोईसर तर्फे दिनांक: ११/०९/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजले पासून बोईसर एस. टी. बस डेपो शेजारी गोसालिया पार्क या ठिकाणी लोकशाही व शांता पूर्वक मार्गाने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.