दोन पोलिसांमुळे एका महीले चे संकट टळले, अतिप्रसंगाचा प्रयत्न करत असताना दोन नराधमाना पोलिसांनी पकडले
दिनेश जाधव – डोंबिवली
डोंबिवली : खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन परत येत असताना एका महिलेचे रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने अपहरण केले, तिला निर्जनस्थळी नेले. तिला नग्न करुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असताना मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचाऱ्यानी त्या दोन्ही नराधमांवर झडप घातली. या दरम्यान या दोन नराधमांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला देखील केला. मात्र धाडसी पोलिसांनी दोघांना पकडून महिलेला त्यांच्या तावडीतून वाचविले आहे. दोन नराधम प्रभाकर पाटील आणि वैभव तरे यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव सुधीर हसे आणि अतुल भोई आहे. महिलेचा जीव आणि आब्रू वाचवणारे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे।