कलिंगडमुळे नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळेच मृत्यू; पायधुनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणी ११ दिवसांनी धक्कादायक कारण समोर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. उंदीर मारण्याच्या औषधाने चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चौघांच्याही शरीरात सापडलं उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहेत. चौघांच्या शरीरात तसेच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील सापडलं झिंक फॉस्फाईट सापडले आहे.११ दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागला आहे.
२६ तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. चौघांनी रात्री कलिंगड खाल्ले होते. कलिंगड खाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. २६ तारखेला अब्दुल्ला डोकाडिया (४४) त्यांची पत्नी नसरीन (३५) आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा अचानक मृत्यू झाला होता.
मुंबईतील पायधुणीतील चार जणांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. कलिंगड तपासणी केल्यानंतर त्यात भेसळ आढळली नव्हती. त्या चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट आढळलं आहे. याचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो. झिंक फॉस्फाईट त्या चौघांच्या शरिरात गेल्यानं त्यांना उलट्या झाल्या, या नंतर ते फॅमिली डॉक्टरकडे गेले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. उलट्या झाल्यानं विष बाहेर आल्यानं चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट होतं. उंदीर मारण्याच्या औषधानं त्यांचा मृत्यू झाला आहे. कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसं गेलं याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारलंय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
कालिना एफएसएलचे संचालक डॉ विजय ठाकरे यांच्या नेतृत्वात कालिना एफएसएलचे तज्ञ अहोरात्र या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतले होते. शरीरातील बरचसं विष हे उल्टीवाटे बाहेर पडल्याने शरीरातून विषाचे नमुने सापडणं कठीण होऊन बसलं होतं. अखेर कालिना एफएसएलच्याय तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश आलं. चौघांच्याही शरीरात तसेच कलिंगडावर झिंक फॉस्फाइड जे उंदीर मारण्यासाठी वापराल जात त्याचे नमुने सापडल्याने चौघांचाही मृत्यू हा उंदीर मारण्याच्या औषधाने झाल्याचं स्पष्ट झाल आहे.
डोकाडिया कुटुंबीयांनी २५ एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर २६ एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.