जुहूतील डॉर्मिटरीच्या रिसेप्शनमधून पाच मोबाईलची चोरी; सीसीटीव्हीत चोर कैद

जुहूतील डॉर्मिटरीच्या रिसेप्शनमधून पाच मोबाईलची चोरी; सीसीटीव्हीत चोर कैद

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरातून चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉर्मिटरीच्या रिसेप्शनमधून पाच मोबाईल फोन चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये आरोपी स्पष्टपणे चोरी करताना दिसत आहे.

माहितीनुसार, जुहू येथील एका डॉर्मिटरीच्या रिसेप्शन काउंटरवर ठेवलेले पाच मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये आरोपी अत्यंत शिताफीने चोरी करताना दिसत असल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

घटनेनंतर जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक करून चोरी झालेले मोबाईल जप्त करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon