अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके अपघातात ठार

अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके अपघातात ठार

पोलीस महानगर नेटवर्क

अहिल्यानगर/नाशिक : नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले असून, त्याच्याशी संबंधित ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हे शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना समृद्धी महामार्गावर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, अशोक खरात सध्या विविध आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात असताना, त्याच्या निकटवर्तीय सहकाऱ्याचा आणि ट्रस्टमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने संशयाचे सावट निर्माण झाले आहे. शेळके हे ट्रस्टच्या आर्थिक व सामाजिक व्यवहारांमध्ये सक्रिय भूमिका बजावत होते, अशी माहिती पुढे येत आहे.

या पार्श्वभूमीवर, शेळके यांच्या मृत्यूमागे केवळ अपघात आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत विविध चर्चांना उधाण आले असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon