मनमाड स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा; ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून तरुणाचा जीवघेणा प्रताप

मनमाड स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा; ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून तरुणाचा जीवघेणा प्रताप

योगेश पांडे / वार्ताहर 

नाशिक – मनमाड रेल्वे स्थानकात शुक्रवारी दुपारी एक अनोळखी व्यक्ती रेल्वे ओव्हर हेड वायर पोलवर चढल्याने एकच खळबळ उडाली. त्याला खाली उतरवण्यासाठी रेल्वे पोलीस आरपीएफ आणि सुरक्षा रक्षक यांनी खूप प्रयत्न केले. अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर काही जण या तरुणापर्यंत पोहचले आणि दोरखंडाने बांधून त्याला खाली आणण्यात आले. वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे काही ट्रेनचा खोळंबा झाला.

एक तरुण मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ४ वरील हायटेन्शन असलेली ओव्हर हेड वायरवरवर चढल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे कर्मचारी, आरपीएफ, रेल्वे पोलीस यांची तारांबळ उडून त्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित केला त्यानंतर या या तरुणाला खाली उतरविण्याची कसरत सुरु झाली. दोन कर्मचारी त्याला पकडण्यासाठी गेले असता खाली उडी मारण्याची धमकी हा तरुण देत होता.

वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे काही ट्रेनचा रेल्वे स्थानकावर खोळंबा झाला. अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर काही जण या तरुणापर्यंत पोहचले आणि दोरखंडाने बांधून त्याला खाली आणण्यात आले. हा तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत असून तो ओवर हेड वायरपर्यंत कसा गेला? तो कोण आहे? कुठला आहे याचा रेल्वे पोलीस आणि आरपीएफ तपास करीत आहे.

या प्रकारामुळे स्टेशनवर मोठा गोंधळ उडाला होता. त्याच्या या कृत्यामुळे स्थानकातील इतर प्रवाशांमध्ये मोठं भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी ‘ओव्हर हेड वायर ‘अगदी जवळच होती. त्याचा थोडाही स्पर्श या वायरला झाला असता तर त्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला असता. मात्र, रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाने प्रसंगावधान राखत तात्काळ ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon