मनसेचा गुढीपाडवा मेळावा; दादरमध्ये रस्ते वाहतुकीत मोठे बदल

Spread the love

मनसेचा गुढीपाडवा मेळावा; दादरमध्ये रस्ते वाहतुकीत मोठे बदल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीनंतर पहिल्यांदाच मनसेचा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यामध्ये काय बोलणार? याकडे संपूर्ण मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १९ मार्च रोजी दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क येथे ‘पाडवा मेळावा’ आहे. त्यानिमित्त आता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूकीमध्ये बदल केले आहेत.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा म्हटल्यावर मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक शिवाजी पार्कामध्ये दाखल होतात. फक्त मुंबई किंवा उपनगरांतूनच नाहीत तर, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक येत असतात. त्यामुळे आज १९ मार्च रोजी दुपारी ०१ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूकीत बदल केला जाणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व दुतगती महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने येणार असल्याने विशेषत: कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन व्यवस्थापनासाठी मुंबई वाहतूक विभागाने नो पार्किंग एरिया, वाहतूक वळविण्याचे पर्यायी मार्ग आणि मेळाव्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सूचना दिलेल्या आहे. नागरिकांची, वाहन चालकांना होणारा अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon