CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले १० मोबाईल शोधले; बाजारपेठ पोलिसांची प्रभावी कारवाई

Spread the love

CEIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले १० मोबाईल शोधले; बाजारपेठ पोलिसांची प्रभावी कारवाई

कल्याण : हरवलेले मोबाईल शोधणे कठीण मानले जात असताना बाजारपेठ पोलीस ठाण्याने प्रभावी कारवाई करत CEIR पोर्टलच्या मदतीने तब्बल १० मोबाईल फोन शोधून काढले आणि ते संबंधित धारकांना परत दिले.

नागरिकांकडून मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर IMEI क्रमांकांच्या आधारे शोध घेतला असता हे मोबाईल विविध ठिकाणी वापरात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोबाईल जप्त करण्यात आले.

त्यानंतर संबंधित धारकांना पोलीस ठाण्यात बोलावून ओळख पटवून मोबाईल फोन परत करण्यात आले. या कारवाईमुळे मोबाईल गमावलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

बाजारपेठ पोलीस ठाणेकडून पुढेही हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टलचा प्रभावी वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी व आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon