मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडलेल्या दोघी हिंदू सख्या बहीणी घरातून पळून गेल्या; आई-वडिलांना लव जिहादचा संशय
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याणमधून दोन सख्या बहिणी गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याणमध्ये दोन सख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ काढत त्यांना ब्लॅकमेल केलं असल्याचंही बोललं जात आहे. हा सर्व लव जिहादचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन्ही सख्ख्या बहिणी अरबाज नावाच्या तरुणाच्या ताब्यात असल्याचा दावा आई वडिलांनी केला आहे. अरबाज नावाच्या मुस्लिम तरुणाने हिंदू मुलींशी मैत्री वाढवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडीओ काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अरबाज या तरुणाच्या संपर्कात दोन्ही बहिणी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरातून गायब झाल्यावर शेवटचा कॉल अरबाजला केला आहे. अरबाजच्या जाचाला कंटाळून मुलींनी कॉलेज बंद केले होते. आई वडिलांना शिक्षकांचे नाव सांगत वेगवेगळ्या फोन नंबरवरून संपर्क साधत तुमची मुलगी कॉलेजला आली नाही असे सांगत कॉलेजला बोलवत होता. दोघी मुली घरातून गायब झाल्याने आई वडिलांची चिंता वाढली आहे. आमच्या मुली आम्हाला द्या अशी याचना आई वडिलांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश बागुल यांनी हा लव जिहाद असल्याचा दावा केला आहे. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप केला आहे. बागुल यांच्या मदतीने मुलींचे आई वडील पोलिसांपर्यंत पोहोचले आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्या मिसिंगची तक्रार दाखल केली. आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत आमच्या मुली आम्हाला द्या अशी याचना केली आहे.
गायब झालेल्या मुलींच्या तक्रारी संबंधी पोलिसांकडे चौकशी केली असता पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली नसून त्या मुली पळून गेल्या आहेत, असे उत्तर देत मिसिंग दाखल केली असल्याचे सांगितले तर संशयित तरुणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
आईने रडत रडत सांगितलं की, माझ्या दोन्ही मुली अचानक घारतून निघून गेल्या आहेत. दोघींही सोबत निघून गेल्या आहेत, याआधी त्या दोघीही अरबाजसोबत बोलत होत्या,तोच माझ्या मुलींना घेऊन गेला आहे. त्यानेच त्या दोघींनाही ब्लॅकमेल केलं आहे. आम्ही पोलिसांकडे गेलो, मात्र तो काहीच बोलत नाहीये, मला त्यांच्यावरतीच संशय आहे. तोच माझ्या मुलींना घेऊन गेला आहे, घरातून त्या सोनं देखील घेऊन गेल्या आहेत. मंगळसूत्र, चैन, बांगड्या, हे सगळं मुलींनी अरबाजला दिलं असल्याचं सांगितलं होतं, मी जेव्हा पाहिलं, घरी सोनं नव्हतं तेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी अरबाजला दिल्याचं सांगितलं होतं, तो माझ्या मुलींना ब्लॅकमेल करत होता, त्यांचे व्हिडीओ व्हायरल करेन, त्यांनी सांगितलं की, त्याने धमकी दिली त्यावेळी मुलींनी सोनं त्याला दिलं. प्रेमाच्या जाळ्यात त्यानं अडकवलं आणि सोनं वगैरे घेतलं.