अकोल्यातील खडकीत फ्लॅटमध्ये देहव्यवसाय; पोलिसांचा छापा, तीन महिला व ग्राहक ताब्यात

अकोल्यातील खडकीत फ्लॅटमध्ये देहव्यवसाय; पोलिसांचा छापा, तीन महिला व ग्राहक ताब्यात

पोलीस महानगर नेटवर्क

अकोला : अकोला शहरातील खडकी परिसरात एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. खदान पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचण्यात आला होता.

या छाप्यात तीन महिलांसह एका पुरुष ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत दिल्ली आणि जयपूर येथील दोन महिलांना देहव्यवसायासाठी अकोल्यात आणल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित फ्लॅटमध्येच हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे. ताब्यात घेतलेल्या महिलांचे समुपदेशन व पुनर्वसनाबाबतची कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे खडकी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon