राजस्थानहून पार्सलचा बनाव; मामा-भाच्याचे अपहरण, ३ तासांत सुटका

Spread the love

राजस्थानहून पार्सलचा बनाव; मामा-भाच्याचे अपहरण, ३ तासांत सुटका

योगेश पांडे / वार्ताहर

जळगाव : जुन्या चित्रपटांना शोभेल अशा पद्धतीने मामा-भाच्याचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा जळगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासांत पर्दाफाश केला. राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून कृष्णकुमार चौधरी व त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना फसवून डांबून ठेवण्यात आले होते.

तक्रार मिळताच शनिपेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे अकोला येथे धडक देत आरोपी यश माकोडे व एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. ओलिस ठेवलेल्या गणपतलाल यांची सुखरूप सुटका करण्यात आली. जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon