मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधार समितीच्या सदस्यांची नावे जाहीर

Spread the love

मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधार समितीच्या सदस्यांची नावे जाहीर

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – महापालिका निवडणुकीनंतर आता महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. महापौर रितू तावडे यांनी या समितींच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार स्थायी समिती आणि सुधार समितीवर २६ जणांची तर शिक्षण समितीवर २२ जणांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेती पक्षीय बलाबलच्या आधारे या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची निवड करण्यात आली आहे.

पालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर भाजपचे सर्वाधिक म्हणजे १० सदस्य आहेत. त्या खालोखाल ठाकरेंच्या शिवसेनेचे ७, शिंदेंच्या शिवसेनेचे ४, काँग्रेसचे ३, मनसे आणि एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य निवडला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon