लाखोंच्या नफ्याचं आमिष दाखवून व्यावसायिकाला ४१ लाखांचा गंडा; ३ पिता पुत्रांवर गुन्हा दाखल

Spread the love

लाखोंच्या नफ्याचं आमिष दाखवून व्यावसायिकाला ४१ लाखांचा गंडा; ३ पिता पुत्रांवर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – गेल्या काही वर्षांपासून आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्याचे समोर आले आहे. अशातच आता मुंबईतील एका व्यावसायिकाला ४१ लाखांना लुबाडण्यात आल्याचे समोर आले आहे. तीन महिन्यात लाखोंचा फायदा करून देतो असे आमिष दाखवून शिपिंग व्यावसायिक अनिस खान यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अनिस खान यांच्या तक्रारीवरून जे जे मार्ग पोलीस ठाण्यात झाकिरुद्दीन सय्यद, त्यांची मुले शाहबाज सय्यद आणि जबिल सय्यदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिपिंग व्यावसायिक अनिस खान यांना झाकिरुद्दीन सय्यद आणि त्यांची मुले शाहबाज सय्यद आणि जबिल सय्यद यांनी अनिस खान यांच्याकडून व्यावसायिक कर्जाच्या नावाखाली तब्बल ४१ लाख रुपये घेतले. ४१ लाखांच्या बदल्यात त्याच्या व्याजस्वरूपात २० लाख अधिकचे देण्याचे आमिष दिले होते. मात्र काही काळानंतर अनिस खान यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. जाकीरुद्दीन खानवर पुण्यातल्या ओतूर पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. बांधकाम व्यावसायिक असलेल्या झाकीरुद्दीन सय्यदवर पुण्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अनिस खान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ‘माझी अक्फा कॉपोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची सर्विस प्रोव्हाडर कंपनी आहे. ही कंपनी मी माझ्या घरातून ऑपरेट करतो. या व्यवसायातून येणारा नफा हा मी नेहमी गुंतवणूकदारांना देवून त्यांच्या कडून फायदा कमवण्याचा प्रयत्न करत. सन २०२४ मध्ये माझा तसेच माझे जावई फारुख यांच्या ओळखीचा व्यवसायिक व अल्फा लाईफ आर्च या कंपनीचे मालक झाकिरुद्दीन गफफार सय्यद व त्यांची दोन मुले शहबाज सय्यद, जबिल सय्यद यांनी आम्हाला एक स्कीम दिली होती. त्यांनी आम्ही जेवढी रक्कम त्यांना गुंतवणूक म्हणून देणार त्याच्या ५० टक्के आगाऊ रक्कम पुढील ३ महिन्यामध्ये आम्हाला मिळेल अशी प्रलोभन आम्हाला दाखवली.’

पुढे तक्रारीत अनिस खान यांनी म्हटले की, ‘आम्ही सय्यद आणि त्यांच्या दोन मुलांवर विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीच्या नावाने ४०,००,००० रुपये व्यवसायिक कर्ज देण्याचे ठरवले. नमूद करारमध्ये बरेच अटी व शर्ती असून त्यामध्ये एक अट अशी आहे की, झाकिरुद्दीन जर नमूद सर्व रक्कम दिली नाही तर झाकिरुद्दीन यांच्या विरोधात फौजदारी दावा करण्यात येईल. त्यानंतर मी माझ्या खात्यातून झाकिरुद्दीन सय्यद यांच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर आम्ही त्यांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी टाळाटाळ केली. आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon