उल्हासनगरातील नाईटी ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; बार मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल

Spread the love

उल्हासनगरातील नाईटी ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; बार मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

उल्हासनगर – कल्याण, उल्हासनगर आणि परिसरामध्ये पोलि‍सांकडून वारंवार कारवाई होत असतानाही छमछम काही थांबायचं नाव घेत नाहीये. गुरूवारी रात्री विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरमधील कॅम्प नं ४ मधील श्रीराम चौक परिसरामध्ये असलेल्या नाईटी ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. विठ्ठलवाडी पोलिसांकडून बारवर छापा टाकत नाईटी ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी बार मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार पोलिसांकडून कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर परिसरामध्ये कारवाई होणार आहे. त्यानंतरही शहरात ऑर्केस्ट्रा बारमधील बेकायदा गोष्टी थांबताना दिसत नाहीत. बार चालकाने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांना ९ महिला आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी किशोर वालेचा आणि चंद्रकिशोर शाहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले दोघेही मॅनेजर आणि बार मालक आहेत.

पोलिसांनी अचानक धाड टाकल्यामुळे बार मालकांचीही आणि मॅनेजरची चांगलीच धांदळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरामध्ये पोलिसांकडून अनेक ऑर्केस्ट्रा आणि बारवर कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बारवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. गुरूवारी रात्री विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरमधील कॅम्प नं ४ मधील श्रीराम चौक परिसरामध्ये असलेल्या नाईटी ऑर्केस्ट्रा बारमधील महिला तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव करीत आहेत, अशी माहिती मध्यवर्ती पोलिसांना गुरूवारी रात्री मिळाली. माहितीच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी गुरूवारी रात्री नाईटी ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकून कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon