मुंबईच्या संजय गांधी उद्यानातील आदिवासींच्या घरावर बुलडोझर; आंदोलकांची दगडफेक, नॅशनल पार्क बंद
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर या अतिक्रमणाविरोधात जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा मोठा गोंधळ पाहायला मिळाला.यावेळी आतमध्ये राहणारे आदिवासी आणि पोलीस यांच्यामध्ये मोठी झटापट झाली. मात्र, ही सर्व कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होत असल्याचे संजय गांधी नॅशनल पार्क प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या सगळ्या गोंधळानंतर तणावाच वातावरण निर्माण झाल्याने संजय गांधी नॅशनल पार्क मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या बाहेर मुख्य गेटवर बॅरिगेटिंग केली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.१९९५ च्या आधीपासून राहणाऱ्या आदिवासींना संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये राहण्यास परवानगी आहे. त्यानंतर राहायला आलेल्या आदिवासींना घरे देऊन त्यांना पुनर्विकासाचा लाभ मिळाल्याचं प्रशासनाचे म्हणणं आहे, मात्र, असं असताना पुन्हा एकदा काही जणांकडून अतिक्रमण करण्यात आले आणि त्यावर कारवाई करण्यात आल्याचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बोरिवलीत काही घटकांना घरं दिलीत, काहींना राहिली आहेत. यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, त्यासाठी बैठक आहे, मला दगडफेकीसंदर्भात माहिती नाही, मी माहिती घेतो , नॅशनल पार्क सेन्सेटिव्ह आहे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झोपडपट्टी काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर कारवाई करताना पोलिसांवर दगडफेक. कारवाईच्या विरोध करत असताना आदिवासी समाजाने मोठी गर्दी केली.
यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने गोंधळ उडाला.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोलिसांवर दगडफेक करणारे लोकांना पोलिस आता ताब्यात घेतले आहे.या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याचा माहिती मिळत आहे. यानंतर पोलिसांनी संजय गांधी राष्ट्रीय अधिक मोठा बंदोबस्त मागवला आहे.नॅशनल पार्क राहत असलेले जे मूळ आदिवासी नाही त्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त करावे असे आदेश न्यायालयाने दिले होते.