झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न; मतदानापूर्वीच महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध

Spread the love

झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न; मतदानापूर्वीच महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे, १५ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांमधील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. मात्र, तत्पूर्वीच काहींनी विजयाचा गुलाल उधळला. त्यामध्ये, कोकण अग्रेसर राहिला असून कोकणात महायुतीने विजयी खाते उघडले आहे. तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी आधीच महायुतीचे तब्बल २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात, रायगड जिल्ह्याच्या महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे गणातून उभे असलेले अनिल जाधव बिनविरोध आल्याने महायुतीचे एकूण २२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्येही महायुतीने विजयाचा आनंद साजरा केला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपने १९ तर शिंदे सेनेने २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद मध्ये खारेपाटण जिल्हा परिषद उमेदवार प्राची इस्वालकर, बांदा जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद कामत, पडेल जिल्हा परिषद उमेदवार सुयोगी घाडी, बापर्डे जिल्हा परिषद उमेदवार अवनी तेली, कोळपे जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद रावराणे, किंजवडे जिल्हा परिषद उमेदवार सावी लोके या भाजपकडून बिनविरोध झाल्या आहेत. तर, जाणवली जिल्हा परिषद उमेदवार रुहिता तांबे या शिंदेंच्या शिवसेना उमेदवारही बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे, मतदानापूर्वीच या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला.

येथील पंचायत समितीमध्ये बिडवाडी पंचायत समिती संजना राणे, वरवडे पंचायत समिती सोनू सावंत, कोकीसरे पंचायत समिती साधना नकाशे, पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल, नाडण पंचायत समिती गणेश राणे, बापर्डे पंचायत समिती संजना लाड, नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ, नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके, शिरगाव पंचायत समिती शीतल तावडे, फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण, जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण, आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर, आसोली पंचायत समिती संकेत धुरी हे भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर कोळझर पंचायत समितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे गणेशप्रसाद गवस उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात उबाठा सेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर पंचायत समिती महायुतीचे उमेदवार गणेशप्रसाद गवस बिनविरोध. ठाकरे शिवसेनेचे प्रवीण परब यांनी माघार घेतल्याने गणेशप्रसाद गवस निवडून आले आहेत. गवस हे शिंदेंच्या शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख म्हणून काम पाहत असून कोलझर पंचायत समितीमधून ते बिनविरोध निवडून आले आहेत.

रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडमधून शिंदे शिवसेनेला शुभ संकेत मिळाला आहे. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडणून आले आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेनेने आपला पहिला बिनविरोध विजय मिळवत रायगडमध्ये जल्लोष केला. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढा भरवत आनंद साजरा केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon