महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेत ऑनलाईन १५ हजार रुपये लुटले; अलिबागमध्ये मनसेकडून परप्रांतीय तरुणाला चोप
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगडच्या अलिबागमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात एका प्रारप्रांतीय तरुणाने महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्या मित्राला चक्क १५ हजार रुपये पाठवल्याचे प्रकार घडलाय. अलिबाग येथील वरसोलीमध्ये असणाऱ्या हॉटेल वाइब येथे काम करणाऱ्या एका मराठी महिलेसोबत हा प्रकार घडलाय. तिथेच काम करत असलेल्या एका प्रारप्रांतीय तरुणाने महिलेच्या मोबाईलमधून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्या मित्राला चक्क १५ हजार रुपये पाठविलेय. या मराठी महिलेच्या ही बाब लक्षात येताच महिलेने थेट मनसे कार्यालय गाठलं आणि मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे यांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला, म्हात्रे यांनी क्षणाचा विलंब न करता हॉटेल वाइब गाठलं आणि या तरुणाला याप्रकरणी जाब विचारून चांगलाच चोप दिला.
त्यानंतर महिलेला ही सगळी रक्कम त्या तरुणाकडून पुन्हा मिळवून देण्यात मनसेला यश आल्याची माहिती आहे. मात्र हॉटेल मालकानं अशा परप्रांतीय तरुणांना विना कागदपत्राशिवाय हॉटेलमध्ये ठेवल्याचा आरोप देखील मनसेने केलाय. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.