लाडक्या बहिणीच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचा आरोप; ठाकरे गटाच्या महिलांच्या विरोधानंतर पळ

Spread the love

लाडक्या बहिणीच्या नावाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचा आरोप; ठाकरे गटाच्या
महिलांच्या विरोधानंतर पळ

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – महापालिका मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना अनेक ठिकाणी पैशाच्या वाटपावरुन वाद निर्माण झाल्याचं दिसून येतंय. ताडदेव परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक महिलांनी विरोध केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पळ काढल्याचं दिसून आलं. प्रदीप छेडा, प्रकाश मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप असून ते मंत्री मंगल प्रभात लोढांचे जवळचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

ताडदेवमधील वॉर्ड क्रमांक २१५ मध्ये पैसे मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याची घटना घडली. लाडकी बही‍ण योजनेच्या नावाखाली भाजपचे प्रदीप छेडा, प्रकाश मोरे यांनी हे पैसे वाटप केल्याचा आरोप आहे. मात्र, इमारतीमधील महिलांनी उलट प्रश्न केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी पळ काढल्याचं दिसून आलं.

प्रदीप छेडा हा मंगल प्रभात लोढांचा जवळचे सहकारी मानला जातो. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप झाल्यानंतर त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी ताडदेवमधील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं आहे.

ताडदेवमधील वॉर्ड क्र २१५ ठाकरेंच्या शिवसेनेकडून किरण बाळसराफ तर भाजपकडून संतोष ढाले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसने दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या भावना कोळी यांना रिंगणात उतरवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon