निवडणुकीच्या एक दिवसआधी नवी मुंबईतील राजकीय संघर्ष टोकाला; भाजप अन् शिवसेना गटात तुफान हाणामारी
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – घणसोली परिसरात रात्री भाजप आणि शिवसेना शिंदे गट कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि माजी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीतच हा राडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री घणसोली येथे भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते समोरासमोर आले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र त्याचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
यामध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत वर्चस्व गाजवण्यावरून महायुतीमधील या दोन पक्षांत अंतर्गत धुसफूस वाढल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.