कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान कचरा उचलणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये आग; सुदैवाने कोणतीही हानी नाही

Spread the love

कुर्ला आणि विद्याविहार दरम्यान कचरा उचलणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये आग; सुदैवाने कोणतीही हानी नाही

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईत ऐन गर्दीच्या वेळी लोकल ट्रेन वाहतुकीवर परिणाम करणारी एक धक्कादायक घटना घडली. कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान कचरा उचलणाऱ्या लोकल गाडीत अचानक मोठी आग लागली. या आगीचे धूर हवेत मिसळताना बघायला मिळाले. या आगीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला हा व्हिडीओ पाहिल्यावर आग मोठी होती असं प्रथमदर्शनी दिसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण अशाप्रकारच्या आगीच्या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींना मोठा धक्का बसला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही.

कुर्ला येथील सायडिंगमध्ये उभ्या असलेल्या कचरा लोकल गाडीच्या दुसऱ्या डब्याला आग लागल्याची घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.या घटनेमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पावणे नऊ वाजल्यापासून अप स्लो लोकल मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेला जाणारी स्लो लोकल ट्रेन वाहतूक बंद करण्यात आली होती.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली. ही आगीची घटना ८ वाजून ३८ मिनिटांनी समोर आली होती. यानंतर अवघ्या काही मिनिटांत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. ८ वाजून ५५ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon