देशमुख होम्स परिसरातील गटार समस्येवर पाहणी; नागरिकांसोबत संयुक्त बैठक, दोन दिवसांत कायमस्वरूपी तोडग्याचे आश्वासन
डोंबिवली : देशमुख होम्सच्या मुख्य रस्त्यावर काही दिवसांपासून समोरील झोपडपट्टीकडून रस्त्यावर येणाऱ्या घाण पाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या दरम्यान नागरिकांकडून सविस्तर माहिती घेऊन परिस्थितीची जाण करून घेण्यात आली.
समस्येचे मूळ कारण, गत काही दिवसांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी देशमुख होम्सचे रहिवासी आणि समोरील झोपडपट्टी विभागातील नागरिकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वांनी आपापल्या अनुभवांद्वारे समस्येची तीव्रता स्पष्ट केली.
या समस्येवर पुढील दोन दिवसांत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीचे निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या पाहणी आणि बैठकीवेळी अरुणा मते ताई, साक्षी ताई, कल्याणी देवळेकर ताई, विक्की माने, साल्वे काकी यांसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.