बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या जवळच्या माणसावर बलात्काराचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
छतरपुर– बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या सेवादारावर एका युवतीने बलात्काराचा आरोप केला आहे. लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार केला असं युवतीचा आरोप आहे. आरोपी अजूनपर्यंत फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा सेवादार मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील आहे. छतरपूर जिल्ह्याच्या सिविल लाइन पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र दुबे हा युवक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा निकटवर्तीय मानला जातो. महेंद्र दुबे याचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. पीडित युवतीने सांगितलं की, एका प्रवासादरम्यान तिची महेंद्र दुबेशी ओळख झाली होती. त्यानंतर महेंद्र दुबेने तिच्याशी संपर्क वाढवला. धीरेन्द्र कृष्ण शास्त्री यांच्याशी भेट घडवून देईन असं आश्वासन दिलं.
युवतीने सांगितलं की, आमच्या भेटी-गाठी सुरु झाल्या. त्यातून जवळीक वाढली. त्यानंतर महेंद्र दुबेने तिला लग्नाचं आश्वासन दिलं. मुलीचा आरोप आहे की, आरोपी महेंद्रने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने सांगितलं की, महेंद्र दुबे आधीपासून विवाहित होता. पण त्याने ही गोष्ट लपवून ठेवली. युवतीला ही गोष्ट समजल्यानंतर तिने आरोपी महेंद्र दुबे विरोधात सिविल लाइन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.
सोशल मिडियावर मागच्या अनेक दिवसांपासून या गोष्टीची चर्चा आहे. पीडित मुलगी अनेक दिवसांपासून आरोपीच्या अटकेची मागणी करत आहे. एएसपी आदित्य पटेल यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितलं की, तक्रार दाखल होताच आरोपी विरोधात बलात्कार आणि बीएनएस कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केलाय. मला मारहाण करुन माझा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न झाला, असं आरोप पीडितेने केला. पोलिसांनी सांगितलं की पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये येऊन अशी कुठली तक्रार केली तर त्या संदर्भातही गुन्हा दाखल होईल.