रवींद्र धंगेकर हाजीर हो! पुणे न्यायालयाचे निर्देश, आरोप करणे भोवलं

Spread the love

रवींद्र धंगेकर हाजीर हो! पुणे न्यायालयाचे निर्देश, आरोप करणे भोवल

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने रवींद्र धंगेकर यांना समन्स बजावला आहे. रवींद्र धंगेकर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात मानहानीचा दावा केला होता. या प्रकरणी आजपासून न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून रवींद्र धंगेकर यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

रवींद्र धंगेकर विरुद्ध समीर पाटील यांच्या विरोधातली लढाई आता कोर्टात गेली आहे. ७ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तर ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे कोर्टाने रवींद्र धंगेकर यांना आदेश दिले आहेत. समीर पाटील यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा फोटो पुढे करत धंगेकरांनी गंभीर आरोप केले होते.

गुंड निलेश घायवळ हा विदेशात पसार झाला आणि पासपोर्टबाबत जोरदार चर्चा सुरू झाली . रविंद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप करत समीर पाटील हे कोथरुड मधील गुन्हेगारी चालवत असल्याचा आरोप केला. तसेच, समीर पाटील यांचा गुंड निलेश घायवळसोबतचा फोटो पुढे करत गंभीर आरोपही केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर यांनी समीर पाटील यांच्या विरोधात जी वक्तव्ये करत आहेत, त्यांचा कोणताही संदर्भ अथवा पुरावा नाही, असे समीर पाटील यांचे म्हणणे आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी तसेच त्यांच्या व्यावसायिक व व्यक्तिगत नुकसान आणि मानहानीसंदर्भात हे दावे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी, समीर पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना ५० कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली होती, त्यानंतर प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे.

समीर पाटील हा मोक्यातील गुन्ह्याचा आरोपी आहे, असे म्हणत समीर पाटील यांचा निलेश घायवळसोबतचा फोटोही धंगेकरानी दाखवला होता. तर, निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी दिली. समीर पाटील हा पोलिसांवर दादागिरी करत आहे, असे पोलीसच सांगतात. त्यामुळे, चंद्रकात पाटलांना त्यांच्या ताटाखाली काय चाललं आहे हे का कळत नाही? समीर पाटीलचा बंदोबस्त केला पाहिजे, असेही धंगेकरांनी म्हटले होते. गुन्हेगारी विश्वास पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांना कशी मदत करता येईल हे काम समीर पाटील करतो असा आरोप त्यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon