शिवडीतील दुपारच्या जबरी चोरी प्रकरणाचा छडा; मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ४ आरोपी अटकेत आणि ₹२.२९ कोटींचे सोन्याचे दागिने जप्त! 

Spread the love

शिवडीतील दुपारच्या जबरी चोरी प्रकरणाचा छडा; मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ४ आरोपी अटकेत आणि ₹२.२९ कोटींचे सोन्याचे दागिने जप्त! 

सुधाकर नाडार / मुंबई 

मुंबई – काळाचौकी परिसरातील बॉम्बे कॉटन मिल कंपाऊंडमधून परतताना झालेल्या तब्बल ₹२.२९ कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांच्या जबरी चोरीचा छडा आर.ए.के. मार्ग पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक करून चोरीला गेलेले दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हस्तगत केले आहेत.

घटनेचा तपशील असा की, फिर्यादी शामलाभाई होथीभाई रबारी (३१) हे १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी आपल्या कंपनीतील सोन्याचे दागिने हॉलमार्क करून परत फॅक्टरीकडे नेत असताना, शिवडी कोर्टजवळ आर.ए.के. चार रोडवर दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवरून पाठलाग करून त्यांच्या गाडीला धक्का दिला. त्यानंतर आरोपींपैकी एकाने पिस्तूल दाखवून धमकावत फिर्यादीकडील २,०६७ ग्रॅम वजनाचे, ₹२.२९ कोटी किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने बॅगसह लंपास केले.

या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच मा. अपर पोलीस आयुक्त मध्य विभाग श्री. विक्रम देशमाने, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ४) श्रीमती रागसुधा, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (माटुंगा विभाग) श्री. सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनोद तावडे (आर.ए.के. मार्ग पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.

घटनास्थळी गुन्हे प्रकटीकरण पथक, एटीसी पथक, सायबर अधिकारी, तसेच माटुंगा, सायन, अँटॉपहिल व इतर पोलीस ठाण्यांच्या टीम अशा एकूण आठ पथकांनी वेगवान तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, पोलिसांनी सोन्याच्या कारखान्यातील सुमारे २०० कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

तपासादरम्यान आरोपींचा माग अहमदाबाद, गुजरात येथे लागला. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकून भानाराम भगराज रबारी (२१) व लिलाराम नागजी देवासी (२१) या दोघां आरोपींना अटक केली. या दोघांकडून चोरीतील २,१८० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹२.२९ कोटी) आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत उघड झाले की हा गुन्हा फिर्यादीच्याच संगणमताने घडवून आणला गेला होता.

त्यानुसार फिर्यादी शामलाभाई होथीभाई रबारी उर्फ शंकर (३१) आणि त्याचा सहकारी जोगाराम मसरूराम देवासी उर्फ मोठा जगदीश यांनाही अटक करण्यात आली. चौघांनी मिळून फौजदारी कट रचून ही जबरी चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कारवाईमुळे शिवडी परिसरात घडलेल्या या धाडसी चोरीचा उलगडा झाला असून, आर.ए.के. मार्ग पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) श्री. विक्रम देशमाने, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ०४) श्रीमती रागसुधा, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (माटुंगा विभाग) श्री. सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या तपासामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनोद तावडे (आर.ए.के. मार्ग पोलीस ठाणे) यांनी नेतृत्व केले असून, त्यांना पोलीस निरीक्षक श्री. संजय परदेशी, गुन्हा दाखल अधिकारी पोउनि समाधान कदम, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी श्री. गोविंद खैरे, श्री. महेश मोहिते व त्यांचे पथक, तसेच सायबर अधिकारी श्री. योगेश खरात आणि ए.टी.सी. पथक यांनी महत्वाची मदत केली.

तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, मदणे, शेवाळे, पोउनि अमित कदम, चौधरी, नवले, पोउनि सुनील पाटील, भोसले, खाडे, प्रविण पाटील, आणि इतर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एकत्रित प्रयत्न करून ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon