बृहन्मुंबई पोलीसांनी मागील महिन्यात १४६४ हरविलेले मोबाईल आणि लाखो रुपये किंमतीची मालमत्ता परत केली!
सुधाकर नाडार / मुंबई
मुंबई – बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ३, ४ व ५ मधील गुन्ह्यांत चोरीस गेलेले आणि हरविलेले मोबाईल फोन व इतर महत्त्वाची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. मध्य प्रादेशिक विभाग, परिमंडळ ३, ४, ५ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांतील CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी, सायबर अधिकारी तसेच पोलीस ठाण्यांचे सर्व अधिकारी व अमलदार यांनी उत्तम व भरीव कामगिरी करून एकूण १४६४ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.
परिमंडळ ०३: ताडदेव (६२), नागपाडा (८०), आग्रीपाडा (४८), भायखळा (६१), वरळी (५५), ना.म. जोशी मार्ग (५०) — एकूण ३५६ मोबाईल
परिमंडळ ०४: भोईवाडा (७२), काळाचौकी (४८), माटुंगा (७९), र.अ.कि. मार्ग (५८), सायन (६९), अँटॉप हिल (६१), वडाळा टी.टी (६१) — एकूण ४४८ मोबाईल
परिमंडळ ०५: दादर (१३८), शिवाजी पार्क (११३), माहिम (८८), शाहूनगर (७०), धारावी (९७), कुर्ला (१०८), वि. भा. नगर (४६) — एकूण ६६० मोबाईल
हस्तगत केलेल्या मोबाईल फोनांची अंदाजे किंमत ₹३,००,७५,०००/- आहे, तर चोरीस गेलेले सोनं-चांदीचे दागिने अंदाजे ₹२१,८७,०००/- किमतीचे आहेत. एकूण सुमारे ₹३,२२,६२,०००/- किमतीची मालमत्ता परत करण्यात आली आहे.
सर्व हस्तगत मालमत्ता मा. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३, ४, ५ आणि संबंधित सपोआ व पो.नि. यांच्या उपस्थितीत संबंधित नागरिकांना परतवण्यात आली. यासोबत वृत्तपत्र, सोशल मीडिया फोटो आणि व्हिडिओ सुद्धा संलग्न केले आहेत. बृहन्मुंबई पोलीस दलाची ही कारवाई शहरात चोरीस गेलेले मोबाईल व महत्त्वाची मालमत्ता परत करण्यातील मोठा यशस्वी टप्पा ठरली आहे.