ठाण्यात १४३ कोटींचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थविरोधी कारवाईत मोठी कामगिरी केली आहे. आयुक्तालयात दाखल १,३६३ गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला तब्बल १,०७६ किलो वजनाचा अंमली पदार्थ व २,६९२ लिटर कोडीनयुक्त कफ सिरपचा साठा नष्ट करण्यात आला.
या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल ₹१४३ कोटी ५३ लाख ९ हजार इतकी आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित साठा अधिकृतरीत्या नष्ट करण्यात आला असून, या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या नाशप्रक्रियेला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले असून, ठाणे पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना अंमली पदार्थविरोधी मोहिमेत सक्रिय सहभागाची विनंती केली आहे.