घरफोडी व वाहनचोरी प्रकरण उघडकीस; सराईत गुन्हेगार अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : निजामपुरा पोलिसांनी घरफोडी व वाहनचोरीच्या मालिकेत सराईत गुन्हेगार सरनील अहमद मोमीन याला अटक करून मोठी कारवाई केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
मोमीनकडून १ रिक्षा, ३ दुचाकी आणि २२ हजार रुपयांची रोकड असा एकूण १.८२ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.