ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई; ८ किलो गांजासह तरुणाला अटक

Spread the love

ट्रॉम्बे पोलिसांची कारवाई; ८ किलो गांजासह तरुणाला अटक

रवि निषाद / मुंबई

मुंबई – ट्रॉम्बे पोलिसांनी दोन ऑक्टोबर रोजी देवी विसर्जनाच्या दिवशी केलेल्या कारवाईत ८ किलो १७६ ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक केली. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे १ लाख ६० हजार रुपये असून, कारसह एकूण मालमत्ता जवळपास ९ लाख रुपयांची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परिमंडळ ६ चे पोलिस उपायुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्र नगर आरोग्य केंद्राजवळ एक संशयास्पद वाहन व त्याजवळ उभा असलेला युवक दिसल्याने पोलिसांनी तपास केला. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडील बॅगमधून ८ किलो १७६ ग्रॅम गांजा आढळला.

अटक करण्यात आलेला आरोपी राहुल पिंटू शिंदे (२३) याच्याकडून गांज्याशिवाय ८ लाख किमतीची कार, ४ हजार रुपयांचा मोबाईल आणि ३ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

ही कारवाई ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ऋता नेमळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon