आरपीआय कार्यकर्ता विजय निकमला तिसऱ्यांदा खंडणी प्रकरणी अटक; साथीदारही पोलिसांच्या रडारवर

Spread the love

आरपीआय कार्यकर्ता विजय निकमला तिसऱ्यांदा खंडणी प्रकरणी अटक; साथीदारही पोलिसांच्या रडारवर

मुंबई – कुर्ल्यातील नेहरू नगर ठक्करबाप्पा कॉलनी परिसरात खंडणीखोरीतून दहशत निर्माण करणारा आरपीआय (अ) कार्यकर्ता विजय निकम अखेर तिसर्‍यांदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आठवडाभरात सलग तीन खंडणीचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले असून, स्थानिक रहिवाश्यांनी त्याला झोपडपट्टी विभागातील “गुंड” ठरवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय निकम हा आरपीआय (अ) नेता दीपक भाऊ निकालजेचा जवळचा माणूस असल्याचे सांगून झोपडीधारकांकडून दहशतीखाली पैसे उकळत होता. अगदी छोटा राजनचा भाऊ असल्याचे खोटे दावे करत तो नागरिकांना धमकावत असल्याचेही उघड झाले आहे.

नेहरू नगर पोलिसांनी मागील काही दिवसांत खंडणीच्या दोन प्रकरणांत निकमला अटक केली होती. परंतु जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा झोपडीधारकांना पैशासाठी धमकावले. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्याच्यावर तिसर्‍यांदा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.

दरम्यान, विजय निकमसोबत सुनीता, ओमप्रकाश, “चिंदीचोर विजय” यांच्यासह इतर काही साथीदार खंडणी रॅकेटमध्ये सामील असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांच्याविरुद्धही कारवाईची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नेहरू नगर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांनी विजय निकमसारख्या सराईत गुन्हेगाराला कायमचा हद्दपार करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon