प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कारवाईसाठी पोलिसांचे आवाहन; नागरिकांची साथ आवश्यक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू आणि तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा बेकायदेशीर क्रियाकलापांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी नागरिकांची सक्रिय साथ महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांनुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्व पदार्थ बंदी घालण्यात आले आहेत. तरीदेखील काही ठिकाणी अशा पदार्थांची गुप्त विक्री किंवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येते.
पोलिसांनी आवाहन केले आहे की, अशा बेकायदेशीर क्रियाकलापांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी विलंब न करता १०० हेल्पलाईन क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. नागरिकांनी दिलेल्या माहितीवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.