ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांची मदरसा सदस्यांसोबत बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Spread the love

ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांची मदरसा सदस्यांसोबत बैठक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

पोलीस महानगर नेटवर्क 

डोंबिवली – ईद-ए-मिलादनिमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी डोंबिवली पोलिसांकडून मदरसा सदस्यांसोबत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा चुकीच्या संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलिसांनी नागरिकांनी कोणतीही शंका अथवा तणाव निर्माण करणारी माहिती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगितले. तसेच धार्मिक सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

पोलिसांच्या या पुढाकाराचे स्थानिक स्तरावर स्वागत करण्यात आले असून, सर्वांनी मिळून सामंजस्य व शांततेचे वातावरण राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon