पत्नीचा खून करून पुरावे नष्ट करणारा निर्दयी आरोपी भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – स्वतःच्या पत्नीचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या एका निर्दयी पतीला भोईवाडा पोलिसांनी अचूक तपास करून अखेर गजाआड केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या ठसे, शेजाऱ्यांच्या जबाबांवरून तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित पतीला ताब्यात घेतले. कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
या कारवाईत भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला. सध्या आरोपीविरुद्ध भादंवि कलमानुसार खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गुन्हा कितीही हुशारीने केला तरी पोलिसांच्या तपासापासून सुटणं अशक्य, याचे आणखी एक उदाहरण या प्रकरणातून अधोरेखित झाले आहे.