फक्त १२ तासांत पोलिसांची कामगिरी!
प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणातील मोबाईल तात्काळ परत
ठाणे : शहरातील पोलीस ठाणे प्रॉपर्टी मिसिंग क्र. १५५२/२०२५ या प्रकरणात हरवलेला मोबाईल फोन अवघ्या १२ तासांत शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. तपास पथकाने तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करून मोबाईलचा मागोवा घेत तक्रारदाराच्या हाती सुपूर्द केला.
हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या दक्षतेचे आणि तांत्रिक तपासकौशल्याचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.