ठाणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाहनचोरीत गुंतलेल्या सराईतांना अटक, तब्बल २८ वाहने जप्त

Spread the love

ठाणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वाहनचोरीत गुंतलेल्या सराईतांना अटक, तब्बल २८ वाहने जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल २८ मोटारसायकली व चारचाकी वाहने (किंमत रु. १७,८९,८९९/-) जप्त करण्यात आली असून एकूण २६ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण, नवी मुंबई व बृहनमुंबई परिसरात वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा, घटक-२ भिवंडी व घटक-३ कल्याण यांनी स्वतंत्र पथके तयार केली होती. गुप्त बातमीदारांच्या माहितीबरोबर तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत आरोपींचा शोध घेण्यात आला.

या तपासात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

१. अतुल सुरेश खंडाळे (खंडागळे), वय २४, रा. हडपसर, पुणे
२. शेखर गोवर्धन पवार, वय ३०, रा. जळगाव
३. आकाश मच्छिंद्र नसरगंध, वय २३, रा. कल्याण (पश्चिम)
४. गाझी लकीर हुसैन, वय १९, रा. आंबिवली, ता. कल्याण
५. मुश्ताक इस्तीयाक अंसारी, वय ३१, रा. भिवंडी

आरोपींकडून २८ वाहने जप्त करण्यात आली असून, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, बृहनमुंबई तसेच ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले २६ गुन्हे उघडकीस आले आहेत.

उघडकीस आलेले काही गुन्हे :

भिवंडी शहर पो. ठाणे गु.र.नं. ८३०/२०२५, ८३३/२०२५

नारपोली पो. ठाणे गु.र.नं. १६३८/२०२५, १७७२/२०२५

धारावी, कांदिवली, माहिम, नवघर, कोळशेवाडी, विष्णुनगर, मानपाडा, मुंब्रा, अंबरनाथ, तळोजा, बाजारपेठ, मध्यवर्ती, वासिंद आदी ठाण्यांतील गुन्ह्यांचा समावेश

ही यशस्वी कारवाई मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर, मा. अमरसिंह जाधव, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) व मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-१) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वपोनिरी जनार्दन सोनवणे (भिवंडी घटक-२), वपोनिरी अजित शिंदे (कल्याण घटक-३) यांच्यासह गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार – सपोनि श्रीराज माळी, मिथुन भोईर, सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, पोउनि रविंद्र पाटील, किरण भिसे, विनोद पाटील, तसेच अन्य पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी – यांनी मोलाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा कणा मोडीत निघाला असून, नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon