मुलीच्या प्रियकरावर फिदा झालेल्या बायकोनेच घर लुटलं!
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दिंडोशी पोलिसांनी उघडकीस आणलेला प्रकार ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. गोरेगाव पूर्व संतोषनगरमध्ये राहणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्याच्या बायकोने स्वतःच्या मुलीच्या प्रियकरावर मोहित होऊन पतीचं सोनंच उचललं. एवढंच नाही, तर पतीवरच चोरीचा खोटा ठपका ठेवून पोलिसांकडे धाव घेतली.
पण पोलिसांच्या तपासाआधीच या बायकोचं बिंग फुटलं. तिने घरातून साडेदहा तोळे सोन्याचे दागिने चोरून प्रियकराला दिल्याचं कबूल केलं.
उर्मिला हळदीवे हिने घरातील दागिने गायब असल्याचं सांगत पतीवरच आरोप केला.
पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता उर्मिलाचे मोबाईल कॉल डिटेल्स हाती आले.
तपासात समोर आलं की उर्मिलाचे गुप्त संबंध कुणाशी तर ते तिच्याच मुलीच्या बॉयफ्रेंडशी!
पळून जाण्याच्या प्लॅनसाठी तिने घरचं सोनं लंपास करून प्रियकराला दिलं.
दिंडोशी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून तिच्याकडून साडेदहा तोळे सोनं जप्त केलं आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे का, याचा तपास सुरू आहे.