लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच दिली जीव घेण्याची धमकी

Spread the love

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; लग्नाची मागणी करताच दिली जीव घेण्याची धमकी

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मच्छिंद्र शंकर आहेर (रा. मुरलीधर रेसिडेन्सी, वडजाई मातानगर, मखमलाबाद रोड, नाशिक) या तरुणाविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ ते २४ जुलै २०२५ या कालावधीत वडजाई मातानगर, दत्तनगर, पेठ रोड परिसरात आरोपीने फिर्यादी महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. मात्र, महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तिच्यासोबतच तिच्या मुलाला देखील मारहाण केली.

“आपण वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे आपले लग्न होऊ शकत नाही. माझ्या पत्नीबाबतचा कोर्टातील वाद संपत आला आहे, ती आता माझ्यासोबत राहणार आहे. तू आमच्या संसारात अडथळा आणलास तर तुला जीवंत ठेवणार नाही,” अशा धमक्या आरोपी आहेर याने पीडितेला दिल्या. एवढेच नव्हे तर त्याने महिलेबरोबर लग्न करण्यास नकार देऊन घरखर्चासाठी पैसे देणेही बंद केले.

या प्रकारामुळे धक्कादायक अवस्थेत सापडलेल्या महिलेने अखेर पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्कारासह धमकीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon