अग्निवीर जवानाकडून रायफल पळवल्याचं प्रकरण, मुंबईतून दोन संशयितांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतल्या कुलाबा इथून अग्निवीर सैनिकाकडून रायफल आणि जिवंत काडतूसं घेऊन संशयित फरार झाला होता. आता याप्रकरणी या अग्निवीराची नौदल पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येते आहे. नौदलानं या अग्निवीराची बोर्ड ऑफ इन्क्वायरी सुरू केलीय. शस्त्र योग्य पद्धतीनं हाताळण्याचा नियम पाळला नसल्याचं समोर आलं. ज्या संशयितानं अग्निवीराकडून रायफल घेतली तो अनेक तास नौदलाच्या कॅम्पसमध्ये फिरत होता. या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रायफल आणि जिवंत काडतूसं घेऊन अज्ञात व्यक्ती फरार झाला होता.या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांचा अटक करण्यात आली आहेत. युनिफॉर्म बदलल्यानंतर अज्ञात व्यक्तीनं रायफल आणि काडतूसं एका पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये पॅक केली आणि बाहेर वाट पाहात असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे फेकली. मुंबई पोलिस सीसीटीव्हीच्या मदतीनं या दुसऱ्या व्यक्तीचाही शोध घेत होते.
ज्याच्याकडून काडतूसं घेतली त्याचीही चौकशी केली जात आहेत. या प्रकरणानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईतून दोन संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अग्निवीर देखील या कटात सामील आहे का? याची देखील चौकशी सुरू केली आहे. हा व्यक्ती भारतातील आहे का? नेमका काय हेतू होता या सगळ्याची चौकशी पोलीस करत आहेत.