घोडबंदर परिसरात शेतजमिनीतील खड्ड्यात ३५ वर्षाच्या महिलेसह तीन वर्षाच्या बालिकेचे मृतदेह सापडल्याने खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – शेतजमिनीतील खड्ड्यात दोन मृतदेह सापडल्याची खळबळ घटना ठाण्यामधून समोर आली आहे. एका ३५ वर्षाच्या महिलेसह तीन वर्षाच्या बालिकेचे हे मृतदेह आहेत. या दोघी मायलेकी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कासारवडवली परिसरातील एका शेतजमिनीत उघड्या खड्ड्यात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ३५ वर्षीय महिलेचा आणि तीन वर्षाच्या बालिकेचे हे मृतदेह आहेत. अडीच फूट खोल शेत जमिनीचा हा खड्डा आहे, ज्यामध्ये हे दोन्ही मृतदेह आढळून आलेत.
स्थानिकांना या खड्ड्यात दोन मृतदेह तरंगताना दिसल्याने स्थानिकांनी याबाबत माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान यांच्या बदकाच्या मदतीने दोन्ही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिले. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.पुढचा तपास कासारवडवली पोलीस करत आहे.