भांडूपमध्ये रस्त्यात करंट पसरला; वीजेचा झटका बसून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – भांडूपमध्ये रस्त्यावरती खुले असलेल्या विजेच्या तारांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात घडला. मृत्यू झालेल्याचे नाव दीपक पिल्ले असून तो फक्त १७ वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक एल. बी. एस. मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने जात होता. त्याने कानात हेडफोन घातले होते, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी केलेले इशारे त्याला ऐकू आले नाहीत. रस्त्यावर महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती, आणि त्याच्याशी संपर्कात येताच विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी दिनेश जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रस्त्यातून अनेक लोक जात होते, आम्ही त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. दीपककडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण कानात हेडफोन असल्यामुळे तो ऐकू शकला नाही. आम्ही मागे धावत गेले, पण तो आधीच वायरच्या संपर्कात आला होता आणि खाली पडला,” असे त्यांनी सांगितले. या घटनेवेळी परिसरातील नागरिकांनी सतर्कतेचे इशारे दिल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले. परंतु, दीपक या दुर्दैवी घटनेत अडकला. या प्रकाराने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, नागरिकांनी आणि प्रशासनाने अशा ठिकाणी त्वरित सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महावितरणकडून रस्त्यावरची खुली हाय टेन्शन वायर लगेच दुरुस्त करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले जात आहे. कानात हेडफोन घालून भर पावसात तो जात होता .भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता. परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती. त्या मधून झालेल्या विजेचा प्रवाहामुळे शॉक लागून दिपकचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार दीपकने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले, परंतु कानातल्या हेडफोन मुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या वायर च्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.