एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली १४.४० लाखांची फसवणूक; आझाद मैदान पोलिसांकडून आरोपींना अटक

Spread the love

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली १४.४० लाखांची फसवणूक; आझाद मैदान पोलिसांकडून आरोपींना अटक

मुंबई – आझाद मैदान पोलिसांनी मोठी कामगिरी करत एमबीबीएस प्रवेश मिळवून देतो म्हणून तब्बल १४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून, फसवणुकीची १००% रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीस मंत्रालयीन कोट्यातून एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आरोपींनी २६ मे २०२२ ते २९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत फसवणूक केली होती.

अटक आरोपींची नावे;
१. कृष्ण मोहन विष्णूदत्त शर्मा (४६), रा. आग्रा, दिल्ली
२. एनुल झेनुल हसन (३२), रा. धीरज नगर, तांडा, रामपूर (उत्तर प्रदेश)
तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक १ कृष्ण मोहन शर्मा यास पुण्यातून ३ ऑगस्ट २०२४ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी क्रमांक २ एनुल हसन यास ८ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील त्याच्या गावाहून अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना अटक करून सखोल चौकशीदरम्यान संपूर्ण ₹१४,४०,००७ इतकी फसवणूक केलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि. लिलाधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. राजेंद्र कटरे, पो.शि. सचिन पाटील, पो.शि. अमरदीप कीर्तकर, पो.शि. गोपी पाटील आणि पो.शि. ज्ञानेश्वर मुंढे यांनी केली. स.पो.नि. लिलाधर पाटील तपास करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत आदाटे, आझाद मैदान पोलीस ठाणे यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon