अँटॉपहिल पोलिसांची धडक कारवाई; अवैध शस्त्रसाठा जप्त, आरोपीला अटक
मुंबई – गुप्त माहितीच्या आधारे अॅन्टॉपहिल पोलिसांनी केलेल्या धाडीत अवैध शस्त्रसाठा जप्त करत एकाला अटक केली. या कारवाईत दोन अवैध अग्निशस्त्र, ४९ जिवंत काडतुसे आणि १८ बोर कारटेज असा मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, अँटॉपहिल पोलिसांनी सरबजीतसिंह कवलजीतसिंह बजवा (वय ५२) यांच्या घरावर छापा टाकला. झडतीत ₹४०,००० किमतीचा ३२ एमके ३ फिलगन कानपूर २०१० लोखंडी रिव्हॉल्वर, ₹१०,००० किमतीची १२ बोर डबल बॅरेल गन, ₹३६० किमतीचे १८ नग १२ बोर प्लास्टिक कारटेज आणि ₹२४,५०० किमतीची ४९ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य विभाग) श्री. विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०४) सौ. रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त (सायन विभाग) श्री. शैलेंद्र धिवर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अँटॉपहिल पोलीस ठाणे) श्री. शिवाजी पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले (गुन्हे), एपीआय प्रदीप पाटील, पो.ह. सागर घस्ते, पो.शि. दिनेश पाटील, पो.शि. सुधीर माने, पो.शि. अनिल बाबर, पो.शि. निलेश माने, म.पो.शि. सोनावणे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.