४ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण व खून उघड; कोळसेवाडी पोलिसांची गुन्याचा तपासात मोठी कामगिरी

Spread the love

४ वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण व खून उघड; कोळसेवाडी पोलिसांची गुन्याचा तपासात मोठी कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क 

भिवपुरी (जि. रायगड) – संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरण व खुनाचा गुन्याचा तपास कोळसेवाडी पोलिसांनी वेगाने उलगडत आरोपी दाम्पत्याला अटक केली.

घटना कशी घडली?

तक्रारदार सौ. ज्योती ज्ञानेश्वर सातपुते (वय २८, रा. खडेगोलवली, कल्याण) यांनी ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादींच्या ४ वर्षांच्या भावी मुलीचे १३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले होते. अपहरणाचा आरोप मुलीच्या वडिलांचे मेव्हणी अपर्णा अनिल मकवाना उर्फ अपर्णा प्रथमेश कांबरी व तिचा पती प्रथमेश प्रविण कांबरी (दोघे रा. भिवपुरी, जि. रायगड) यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९८२/२०२४, भा. दं. सं. कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटक आणि धक्कादायक कबुली

तपास पथकाला खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की आरोपी दाम्पत्य त्यांच्या राहत्या घरी चिंचवली (भिवपुरी रोड, ता. कर्जत, जि. रायगड) येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत आरोपी प्रथमेश कांबरी याने कबुली दिली की, अपहरित मुलीला वारंवार समज देऊनही ऐकत नसल्याने त्याने मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी प्रथमेश व त्याची पत्नी अपर्णा यांनी मृतदेह गोणीत ठेवून, त्यावर गादी गुंडाळून चिंचवली गावच्या शिवारातील निर्जनस्थळी फेकून दिला.

आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची नावे –

१) प्रथमेश प्रविण कांबरी (वय २३, व्यवसाय – बिगारी काम)

२) अपर्णा प्रथमेश कांबरी (वय २२, व्यवसाय – घरकाम)

या दोघांना ११ ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आली. त्यांना १२ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon