नाशिकमध्ये वाईन शॉप फोडून सव्वाचार लाखांची दारू लंपास; गंगापूर रोडवरील घटना

Spread the love

नाशिकमध्ये वाईन शॉप फोडून सव्वाचार लाखांची दारू लंपास; गंगापूर रोडवरील घटना

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : शहरातील उच्चभ्रू भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवर एका वाईन शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केली आहे. शटरची पट्टी तोडून दुकानात प्रवेश करत चोरट्यांनी सुमारे चार लाख ३३ हजार २७५ रुपये किमतीच्या महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गंगापूर वाईन शॉप येथे घडली असून, दुकानाचे मालक संदीप भास्कर कोकाटे (रा. मखमलाबाद रोड, इम्पिरिअल अपार्टमेंट) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी शटरची कुलूप पट्टी कशाच्या तरी सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश केला.

चोरीस गेलेल्या दारूच्या महागड्या बाटल्यांमध्ये –

जॉनी वॉकर ब्ल्यू लेबल – ₹२७,०००

रॉयल सॅल्यूट – ₹२४,०००

रामपूर असावा – ₹१४,५००

रामपूर – ₹२५,०००

ग्लेन फिरिच – ₹३१,५००

डिव्हाज – ₹१०,४००

ग्लेन लेबिट – ₹४६,५००

मॅकेलन – ₹२०,०००

हिबिकी – ₹२०७५

डालमोअर – ₹१६,५००

चिवास अल्टीज् – ₹२१,२००

जॉनी वॉकर – ₹११,२५०

लगाव लीन – ₹१४२५०

जिवास – ₹२८,५००

ग्रेन लिबिट – ₹५१,०००

रेड लेबल – ₹२,४००

ब्लॅक लेबल – ₹४,२००

याशिवाय दुकानातून ₹४५,००० रोख रक्कम देखील चोरीस गेली आहे.

एकंदरित ४ लाख ३३ हजार २७५ रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कहांडळ या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, लवकरच चोरट्यांचा सुगावा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या दृष्टीने दुकानांना अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon