महिलांच्या प्रतिष्ठेला तडा देणाऱ्या कारवायांवर पोलिसांचा दणका ! काशिमीरा ऑर्केस्ट्रा बारवर छापा; २२ जणांविरोधात गुन्हा दाखल, ६ लाखांची रोकड जप्त

Spread the love

महिलांच्या प्रतिष्ठेला तडा देणाऱ्या कारवायांवर पोलिसांचा दणका ! काशिमीरा ऑर्केस्ट्रा बारवर छापा; २२ जणांविरोधात गुन्हा दाखल, ६ लाखांची रोकड जप्त

मिरारोड – काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या करवली ऑर्केस्ट्रा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीररित्या चालवण्यात येणाऱ्या महिला नृत्याच्या कार्यक्रमाचा पर्दाफाश केला आहे. दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण २२ आरोपींविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल ₹६,१३,१९०/- इतकी रोकड व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ श्री. राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. करवली ऑर्केस्ट्रा बार, न्यू मिरा व्ह्यू को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वसाणी पेट्रोल पंपाजवळ याठिकाणी परवाना नसताना महिला सिंगरकडून नृत्य करवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत बारचा मालक, व्यवस्थापक, महिला नर्तिका, वेटर आदींचा समावेश असलेल्या २२ जणांविरोधात महाराष्ट्र उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) मधील नृत्यावर बंदी आणि महिलांच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी अधिनियम, २०१६ च्या कलम ३, ८(१), ८(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. स्वप्नील कदम हे करीत आहेत.

ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त श्री. राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती शितल मुंढे आणि त्यांच्या पथकाने बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon