सायबर फसवणुकीचा ‘डिजीटल अरेस्ट’ फॉर्म्युला फसला! रायगड सायबर पोलिसांची मोठी कारवाई, ११ जण अटकेत

Spread the love

सायबर फसवणुकीचा ‘डिजीटल अरेस्ट’ फॉर्म्युला फसला! रायगड सायबर पोलिसांची मोठी कारवाई, ११ जण अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क 

अलिबाग : ‘टेलिकॉम अथॉरिटी’, ‘ सीबीआय’ आणि ‘डिजीटल अरेस्ट’च्या नावाखाली वयोवृद्ध नागरिकांना गंडवणाऱ्या अत्याधुनिक सायबर टोळीचा पर्दाफाश करत रायगड सायबर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून, ६६ लाख रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. या रॅकेटचा प्रारंभ ५ मे २०२५ रोजी झाला, जेव्हा एका वयोवृद्ध फिर्यादीला “टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया”तून असल्याचे सांगत अज्ञात व्यक्तीने ९ नंबर डायल करण्यास सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉलवर स्वत:ला सीबीआय अधिकारी’ सांगून, त्यांच्यावर ‘मनी लॉन्डरिंग’चा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवण्यात आली. सुटका मिळवण्यासाठी, आरोपींनी फिर्यादीकडून १३ व २० मे रोजी एकूण ६६ लाख रुपये विविध खात्यांमध्ये भरायला लावले.

अटकेत असलेले आरोपी:

१. अब्दुस सलाम बारभुयान – आसाम (बोगस कंपनीमार्फत आर्थिक व्यवहार)

२. बिलाल फैजान अहमद, नदीम अहमद, लैराब मोहम्मद रफीक खान, शादान खान, मोहम्मद फैसल खान – जौनपूर, उत्तर प्रदेश (बनावट एसआयपी लाईन्ससाठी बनावट केवायसी/स्टॅम्प तयार करणारे)

३. विनयकुमार राव, गंगाधर मुत्तन – हैदराबाद (जिओ सेल्स मॅनेजर म्हणून बनावट कंपन्यांना SIP लाईन्स पुरवणारे)

४. अभय संतप्रकाश मिश्रा – हरदोई, उत्तर प्रदेश (गुन्ह्याचा मास्टरमाईंड)

५. मोहसीन मिया खान – मुरादाबाद, उत्तर प्रदेश (जवळपास ६१७५ SIM कार्डस हस्तगत)

६. शम्स ताहिर खान – जयपूर, राजस्थान (मार्केटिंग एजंट)

पोलिसांनी जप्त केलेली मालमत्ता:

६१७५ सिम कार्ड्स

३५ मोबाईल फोन्स

लॅपटॉप, व्हीपियन स्वीच, टॅब, आयपॅड

१२ बँक खाती गोठवली

६६ लाख रुपये व ८५ लाखांचे बिटकॉइन संपत्ती

नेपाळमध्ये फ्लॅट, बंगला व गाळे

जनतेस आवाहन:

‘डिजीटल अरेस्ट’ ही कुठल्याही कायदेशीर यंत्रणेमध्ये अस्तित्वात नसलेली बनावट संकल्पना आहे. पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कोणतीही शासकीय संस्था कधीही फोन, व्हॉट्सअँप कॉलवरून कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार अथवा अरेस्ट नोटीस देत नाहीत. संशयास्पद कॉल मिळाल्यास लगेच खालील हेल्पलाईनवर संपर्क साधावा: 📞 1930 / 14407 / 1945

किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon