विश्वासाचे पुनर्स्थापन; परिमंडळ ८ पोलिसांची थोर कार्यवाही; १.५४ कोटींची मालमत्ता मूळ मालकांना परत

Spread the love

विश्वासाचे पुनर्स्थापन; परिमंडळ ८ पोलिसांची थोर कार्यवाही; १.५४ कोटींची मालमत्ता मूळ मालकांना परत

२२७ नागरिकांना न्याय; जनतेचा मुंबई पोलिसांना भरभरून प्रतिसाद

मुंबई – मुंबईतील परिमंडळ ८ अंतर्गत कार्यरत पोलीस ठाण्यांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरणारी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ या सात पोलीस ठाण्यांमार्फत आयोजित सामूहिक मालमत्ता परत वितरण कार्यक्रमात तब्बल ₹१,५४,२१,१४८/- किमतीची गुन्ह्यातून हस्तगत आणि गहाळ झालेली मालमत्ता मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आली. ही मालमत्ता सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, वाहन चोरी, मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या गुन्ह्यांतून हस्तगत झाली होती. या कार्यक्रमात एकूण २२७ नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या अथवा चोरी गेलेल्या वस्तू परत मिळाल्या.

कार्यक्रमाचे आयोजन बीकेसी पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील ‘पासायदान हॉल’ येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप आयुक्त श्री. मनीष कलवानिया (परिमंडळ ८) उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मालमत्ता परत करण्यात आली. गुन्ह्यातून किंवा हरवलेली मालमत्ता परत मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आपल्या मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने त्यांनी मुंबई पोलिसांचे मन:पूर्वक आभार मानले. अनेकांनी “विश्वास पुन्हा जागवणारा” अनुभव असल्याचे मत व्यक्त केले.

मुंबई पोलिसांची जनतेसाठी सातत्यपूर्ण सेवा

हा उपक्रम म्हणजे केवळ मालमत्ता परत देण्यापुरता मर्यादित नसून, तो पोलीस आणि जनतेमधील विश्वास वृद्धिंगत करणारा पाऊल ठरतो आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे न्याय मिळाल्याचा अनुभव नागरिकांना मिळाला. मुंबई पोलीस पुन्हा एकदा “जनतेच्या सेवेत, विश्वासाने!” हे ब्रीद प्रत्यक्षात उतरवताना दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon