गहाळ/चोरी झालेल्या मोबाईलचा शोध लावून पोलीसांचे कौतुक; कल्याण परिमंडळ ३ मधील ७२ मोबाईल फोन तक्रारदारांना परत

Spread the love

गहाळ/चोरी झालेल्या मोबाईलचा शोध लावून पोलीसांचे कौतुक; कल्याण परिमंडळ ३ मधील ७२ मोबाईल फोन तक्रारदारांना परत

पोलीस महानगर नेटवर्क 

कल्याण – परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गहाळ व चोरी झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन एकूण ७२ मोबाईल तक्रारदारांना परत देण्यात आले. या मोबाईल्सची एकूण अंदाजे किंमत ११ लाख १८ हजार ७८० रुपये इतकी आहे.

पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३, अतुल झेंडे व सहायक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सीईआयआर पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने मोबाईल ट्रॅक करून ते शोधण्यात आले.

खडकपाडा, मो. २५, किंमत रु. ६,२२,०००/-

महात्मा फुले, मो. २५, किंमत रु. १,२३,०००/-

बाजारपेठ, मो. ०७, किंमत रु. १,०५,०००/-

कोळसेवाडी, मो. १५, किंमत रु. २,६८,७८०/-

एकूण मोबाईल, ७२ व त्यांची अंदाजे किंमत रु. ११,१८,७८०/- इतकी आहे.

हस्तगत केलेले सर्व मोबाईल फोन तक्रारदारांची ओळख पटवून २ जुलै २०२५ रोजी अधिकृतपणे त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या या तत्पर आणि तांत्रिक कामगिरीबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळण्यास पोलीस किती संवेदनशील आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon