पातूरचे नायब तहसीलदार बळीराम चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

पातूरचे नायब तहसीलदार बळीराम चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्या

पोलीस महानगर नेटवर्क 

अकोला – अकोला जिल्ह्यातील पातूर येथील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांच्याविरुद्ध लाच मागणीच्या गंभीर आरोपांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

शेतकऱ्याकडून ४ हजारांची लाच मागितली

मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कायम खुणा (सीमांकन) करण्यासाठी नायब तहसीलदार चव्हाण यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, या कामासाठी चव्हाण यांनी त्याच्याकडून ४,००० रुपये लाच मागितली होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा, पण सावधगिरीने लाच नाकारली

तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला. मात्र, चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. तरीही, लाच मागणी सिद्ध झाल्याने त्यांना लाच मागणीप्रकरणी तात्काळ अटक करण्यात आली आहे. पातूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पूर्वी केलेले वादग्रस्त गुन्हे दाखल

चव्हाण यांनी यापूर्वी पातूर तहसील कार्यालयात कार्यरत तलाठी, सबनीस तसेच प्रहार संघटनेच्या उपजिल्हा प्रमुखाविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले होते. एक प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून आरोपी जामिनावर आहेत, तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहे. ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकात पोलीस अंमलदार दिगंबर जाधव, राहुल इंगळे, अभय बावस्कर, संदीप ताळे, किशोर पवार, निलेश शेगोकार, असलम शहा आणि चालक नफीस यांचा समावेश होता.

फरार आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणात एक आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. या घटनेने महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला असून, अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon