अंधेरीतील मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव रामभरोसे; आमदार मुरजी पटेल यांनी घेतला आढावा

Spread the love

अंधेरीतील मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव रामभरोसे; आमदार मुरजी पटेल यांनी घेतला आढावा

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – अंधेरी पूर्वेकडील ओल्ड नगरदास रोडवर असलेल्या महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या ७०० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. कारण धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेचा मंगळवारी पहिला दिवस, मात्र विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून पहिल्याच दिवशी धोकादायक इमारतीत बसावं लागलं. महापालिकेची ही इमारत ६० वर्षे जुनी आहे. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या अनेक भिंतींना गेले तडे, स्लॅब देखील ठिकाठिकाणी कोसळले आहेत. इमारत जीर्ण झाली असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संभाव्य धोका ओळखून पालकांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून पालकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी मंगळवारी शाळेची पाहणी केली. यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर आमदार मुरजी पटेल यांनी ताशेरे ओढले. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आमदार मुरजी पटेल यांनी मागणी केली आहे. आमदार पटेल लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून इमारतीच्या बांधकामाची मागणी करणार आहेत. मुंबई महापालिकेचा शिक्षक विभागाने शाळेचा विषय गांभीर्याने घेतला नाही. म्हणून मला आज शाळेची पाहणी करावी लागली. दोन दिवसांपूर्वीही मी येथे आलो होते. ७०० मुलांना इथे रामभरोसे ठेवले जात आहे. परिस्थिती अत्यंत वाईट आहे. पालकांमध्ये भीती असल्याने ते माझ्याकडे रोज येत आहेत. मुंबई महापालिकेचं शिक्षण विभाग झोपलेलं आहे, नुसत्या थापा मारतं. मुलांची जीव धोक्यात आहे तिथे काहीतरी केले पाहिजे, असं मुरजी पटेल यांनी म्हटलं. आगामी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार असल्याचंही मुरजी पटेल यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon