शिवसेना नेत्याची अपहरण करुन हत्या करणाऱ्या सख्ख्या भावाला अखेर ४ महिन्यांनी गुजरातमधील सिलवासातून अटक

Spread the love

शिवसेना नेत्याची अपहरण करुन हत्या करणाऱ्या सख्ख्या भावाला अखेर ४ महिन्यांनी गुजरातमधील सिलवासातून अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याकंडातील मुख्य फरार आरोपी दारू माफिया अविनाश धोडीच्या मुसक्या आवळण्यात अखेर यश आले आहे. जानेवारी महिन्यात शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून मुख्य आरोपी असलेला अविनाश धोडी हा फरार होता. अखेर आता चार महिन्यानंतर अविनाश धोडीला गुजरातमधील सिलवासामधून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या अपहरण आणि त्यानंतर झालेल्या हत्येच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. २० जानेवारीपासून अशोक धोडी हे फरार होते त्यानंतर गुजरातमध्ये बंद पडलेल्या दगडाच्या खाणीमध्ये त्यांची गाडी आणि मृतदेह सापडला होता. या प्रकरणात अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडी हा मुख्य आरोपी असल्याचे समोर आले होते.

पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला होता. तेव्हापासून गेली साडे चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर आता त्याला गुजरातमधील सिलवासामधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात फरार असलेल्या मुख्य तीन आरोपीं विरोधात न्यायालयाने गुन्हेगारी वॉरंट जारी केला होता. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पदभार घेताच मोठे यश मिळवले आहे. दरम्यान, अविनाश धोडी हा अशोक धोडी यांचा सख्खा धाकटा भाऊ असून दोघा भावांमध्ये अनेक वर्षांपासून जमीन आणि संपत्तीवरुन वाद सुरु आहे.अविनाश धोडीचा दारूचा धंदा असून त्याची परिसरात दहशत असल्याची माहिती समोर आली होती. या अगोदरही अविनाश धोडी याने २१ एप्रिल २०२४ रोजी अशोक धोडीवर हल्ला करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon